For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पुष्पा 2 द रुल’मध्ये कॅमियो करणार समांथा

06:02 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पुष्पा 2 द  रुल’मध्ये कॅमियो करणार समांथा
Advertisement

अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा 2 द रुल’ यंदा प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाशी निगडित माहितीची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नजीक येण्यासोबत चाहत्यांची उत्सुकताही वाढत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सध्या जोरदार सुरू असून त्याची छायाचित्रे सातत्याने समोर येत आहेत. तर या चित्रपटात देखील चाहत्यांना समांथा रुथ प्रभूची एंट्री दिसून येणार आहे.

Advertisement

यापूर्वी समांथाने डान्स नंबर करण्यास नकार दिल्याचा आणि ही ऑफर जान्हवी कपूरला देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु या वृत्ताची पुष्टी झाली नव्हती. पण आता समांथा सीक्वेलचा हिस्सा असल्याची आणि ती चित्रपटात कॅमियो भूमिकेत दिसून येणार असल्याची चर्चा आहे.

समांथाने कॅमियो भूमिका साकारावी अशी चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांची इच्छा आहे. समांथाची पहिल्या चित्रपटातील भूमिका दुसऱ्या भागात जारी ठेवू इच्छितात आणि तिसऱ्या भागात तिच्या भूमिकेला महत्त्व देण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे.

Advertisement

अल्लू अर्जुनने यापूर्वीच पुष्पा 3 चे संकेत दिले आहेत. पुष्पाची प्रेंचाइजी स्वीकारण्याची माझी इच्छा असून याचा तिसरा भाग  येऊ शकतो असे अल्लूने म्हटले होते.

‘पुष्पा 2 : द रुल’ची कहाणी दिग्दर्शक सुकुमार आणि श्रीकांत विसा यांनी लिहिली आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदाना सामील आहे. चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.