टॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार समांथा
समांथा रुथ प्रभूने हॉरर कॉमेडी चित्रपट ‘शुभम’द्वारे निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच तिने या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. समांथा आता मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेल्या चित्रपटाची टॉलिवूडकरता निर्मिती करणार आहे. समांथा ही दिग्दर्शक नंदिनी रेड्डीसोबत पुन्हा काम करणार आहे. रेड्डी यांना ‘ओह बेबी’ या हिट चित्रपटासाठी ओळखले जाते. नंदिनी या गंभीर कहाण्या आणि मजबूत व्यक्तिरेखांच्या सादरीकरणासाठी देखील ओळखल्या जातात. यापूर्वी समांथाने नंदिनी यांच्यासोबत ‘जबरदस्त’ आणि ‘ओह बेबी’ या चित्रपटांकरता काम केले होते. समांथा ही 2021 मध्ये ‘द फॅमिली मॅन सीझन 2’द्वारे हिंदी मनोरंजन क्षेत्रात दाखल झली. त्यानंतर तिने वरुण धवनसोबत सिटाडेल : हनीबनी या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आता ती नेटफ्लिक्सची सीरिज ‘रक्त ब्रह्मांड’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी केले आहे. या सीरिजमध्ये समांथासोबत आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी आणि जयदीप अहलावत हे कलाकार दिसून येणार आहेत.