समांथाने राजसोबत थाटला संसार
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतलेली अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने नव्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने सोमवारी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत विवाह केला आहे. विवाहाची सुंदर छायाचित्रे समांथाने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यात ती लाल रंगाच्या साडीत नववधूच्या रुपात दिसून येत आहे. समांथा अन् राजचा हा विवाह ईशा योग केंद्रातील ‘लिंग भैरवी’ मंदिरात पार पडला आहे. या विवाहसोहळ्याला केवळ 30 अतिथींना आमंत्रित करण्यात आले होते.
मागील काही काळापासून समांथा आाणि राज निदिमोरू हे परस्परांना डेट करत होते. समांथा आणि राज यांच्या विवाहातील विधी दर्शविणारी छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. नवदांपत्याला अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज हा ‘फॅमिली मॅन’ या गाजलेल्या सीरिजच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे.
समांथाने 2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत विवाह केला होता. परंतु 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर नागा चैतन्यने मागील वर्षी अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत विवाह केला होता. तर राज निदिमोरुचाही हा दुसरा विवाह आहे.
तर राजची पूर्वाश्रमीची पत्नी श्यामाली डेने सोशल मीडियावर उपरोधिक पोस्ट केली आहे. उतावीळ लोक उतावीळपणे काम करत असतात, असे तिने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद पेले आहे.