समांथा आता निर्मितीच्या क्षेत्रात
ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्सची घोषणा
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभूची लोकप्रियता आता देशभरात आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. अभिनेत्रीने सध्या ‘यशोदा‘ आणि ‘कुशी’ या चित्रपटानंतर अभिनयाच्या क्षेत्रातून ब्रेक घेत स्वत:च्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत पेल आहे. तर आता तिने स्वत:च्या कारकीर्दीला एक पाऊल पुढे नेले आहे. स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना घायाळ करणारी समांथा आता निर्माती झाली आहे.
समांथाने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. समांथाने स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसला ‘ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्स’ असे नाव दिले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून काही क्षणातच व्हायरल झाला आहे. स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसची घोषणा करताना मी अत्यंत उत्साही आहे. ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्सचे लक्ष्य नव्या युगाची अभिव्यक्ती आणि विचारांना प्रतिनिधित्व देणारा कंटेंट तयार करणे आहे. सामाजिक सलोख्याची शक्ती आणि गुंतागुंत वयक्त करणाऱ्या कहाण्यांना आमचे प्रॉडक्शन हाउस आमंत्रित करणार आहे. सार्थक, प्रामाणिक आणि सार्वभौमिक कहाण्या मांडण्यासाठी याद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे समांथाने म्हटले आहे.
समांथा सध्या ‘मायोसिटिस’ नावाच्या ऑटोइम्यून आजाराशी संघर्ष करत आहे. समांथा यापूर्वी ‘कुशी’ या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत दिसून आली होती. समांथा लवकरच ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीत वरुण धवनसोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. याचे दिग्दशंन राज आणि डीके यांनी केले आहे.