‘बंगाराम’ चित्रपटात समांथा
राज निदिमोरू, समांथा रुथ प्रभू आणि हिमांक डुव्वुरु यांनी स्वत:चा बॅनर त्रालाला मूव्हिंग पिक्चर्स अंतर्गत ‘मां इंति बंगाराम’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. याची छायाचित्रे समांथाने सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये समांथाचा कथित बॉयफ्रेड राज निदिमोरूही दिसून आला आहे. प्रेम आणि आशीर्वादासोबत मां इंति बंगारामच्या मूहुर्तासोबत स्वत:चा प्रवास सुरू केला आहे. आम्ही जे निर्माण करत आहोत, त्याला तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे. या विशेष चित्रपटाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचे प्रेम आणि समर्थनाची आवश्यकता आहे, असे समांथाने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद पेल आहे. हा चित्रपट 1980 च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित एक रोमांचक क्राइम थ्रिलर आहे. समांथा ही ‘मां इंति बंगाराम’च्या व्यतिरिक्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘रक्तब्रह्मांड : द ब्लडी किंगडम’ या सीरिजमध्ये दिसून येणार आहे. यापूर्वी समांथा ऊथ प्रभू ही स्वत:च्या प्रॉडक्शन हाउस अंतर्गत निर्मित पहिला चित्रपट ‘शुभम’मध्येही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून आली होती.