समांथाकडून वेबसीरिजचे चित्रिकरण
‘रक्त ब्रह्मांड’मध्ये मुख्य भूमिकेत
समांथा रुथ प्रभू सध्या पॅन इंडिया प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रीत करत आहे. ती यापूर्वी राज आणि डीके यांच्याकडून दिग्दर्शित ‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये दिसून आली होती. आता समांथा लवकरच आणखी एका वेबसीरिजमध्ये दिसून येणार असून याचे नाव ‘रक्त ब्रह्मांड’ असणार आहे. समांथाच्या या आगामी सीरिजचे दिग्दर्शन राज आणि डीके हेच करणार आहेत.
समांथाने काही काळापूर्वी चित्रिकरणातून ब्रेक घेतला होता आणि ती खास वेळ एकांतात घालविण्यासाठी विदेशात गेली होती. परंतु तेथून परतल्यावर ती पुन्हा चित्रिकरणात सामील झाली आहे. समांथाच्या कारकीर्दीकरता ही वेबसीरिज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
समांथा याचबरोबर अनेक दाक्षिणात्य प्रोजेक्ट्सचे काम सुरू करणार आहे. मागील काही काळात तिने वैयक्तिक कारणास्तव अनेक प्रोजेक्ट्स नाकारले होते. परंतु आता तिने पुन्हा जोमाने काम सुरू केल्याने ती प्रेक्षकांना पुढील काळात वारंवार दिसून येऊ शकते. याचबरोबर समांथा आता वैयक्तिक आयुष्यात नवी सुरुवात करत असल्याचे मानले जात आहे. तिचे नाव एका दिग्दर्शकाबरोबर जोडले जात आहे.