सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश प्रदान
03:01 PM Jan 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम मध्ये डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते पेंडूर येथील देवयानी राऊळ,सातार्डा येथील अनंत सातार्डेकर,बिरोडकर टेंब येथील श्रीकृष्ण बिरोडकर,सातार्डा येथील चंद्रकांत आरोंदेकर,चिंदर येथील बाबुराव कासले आणि शेर्ले येथील बाबू आमोणकर यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.कर्करोग, मधुमेह ,मणक्याचे विकार, गुडघेदुखी अशा अनेकविध व्याधींनी पीडित गरजू रुग्णांना हे धनादेश देण्यात आलेले आहेत.
Advertisement
Advertisement