For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेशातील सप आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेशातील सप आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन
Advertisement

दुद्धी मतदारसंघाचे होते आमदार

Advertisement

सोनभद्र : उत्तरप्रदेशच्या दुद्धी मतदारसंघाचे  समाजवादी पक्षाचे आमदार विजय सिंह गोंड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या  अकाली निधनामुळे आदिवासी समुदायासह राजकीय आणि सामाजिक जगताला धक्का बसला आहे. दुद्धी मतदारसंघात सातत्याने सक्रीय राहिलेले सप आमदार गोंड यांना आदिवासी समुदायाचा सशक्त आवाज म्हणून ओळखले जात होते. साधेपणा आणि संघर्षशील प्रतिमेमुळे ते जनतेदरम्यान लोकप्रिय होते.  जल-जंगल-जमिनीचा अधिकार, शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि रोजगारासारख्या मूलभूत मुद्द्यांना त्यांनी नेहमीच प्राथमिकता दिली होती. दुद्धी मतदारसंघातील मागासपणा आणि आदिवासी हितांबद्दल ते सातत्याने आवाज उठवत होते. गेंड यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या निवासस्थानी समर्थक, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी धाव घेतली. समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. गोंड यांचे पूर्ण जीवन जनसेवा आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित राहिल्याचे सप नेतृत्वाने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.