For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅम हार्परचे नाबाद शतक, मुलानी-नचिकेतचा भेदक मारा

06:48 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
सॅम हार्परचे नाबाद शतक  मुलानी नचिकेतचा भेदक मारा
Advertisement

वृत्तसंस्था, पुद्दुचेरी

Advertisement

येथे मंगळवारी सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी, डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (3-77) आणि वेगवान गोलंदाज नचिकेत भुते (3-35) यांना भारतप ए च्या गोलंदाजीची धुरा सांभाळली असताना सॅम हार्परने नाबाद 101 शतकी खेळी करत ऑस्ट्रेलिया ए ला सावरले.

दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया ए ने 7 बाद 282 धावांची सन्मानजक धावसंख्या उभारली होती. चार दिवसांच्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी हार्परच्या नाबाद शतकाने (153 चेंडूत 3 षटकार, 7 चौकारांसह नाबाद 101) संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

Advertisement

याआधी याच मैदानावर झालेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारत ए ने पाहुण्या संघाचा एका डावाने आणि 162 धावांनी धुव्वा उडवला होता. मुंबईचा फिरकीपटू मुलानी पुन्हा एकदा उत्कृष्ट लयीत दिसला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी सलामीवीर सॅम कॉन्स्टास (2) आणि नॅथन मॅकस्वीनी (34) यांना बाद केले. तसेच जेसन संघाची (46) महत्त्वाची विकेटही घेतली. पहिल्या सामन्यात सात बळी घेतल्यामुळे डावखुरा फिरकीपटू मुलानीचा आत्मविशश्वास उंचावलेला होता. चौथ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात मुलानीने लागोपाठच्या षटकांमध्ये संघा आणि मॅकस्वीनी यांना बाद केले.

इंडिया ए च्या गोलंदाजांची चमक

ऑस्ट्रेलिया ए चा कर्णधार पीटर हँड्सकॉम्ब 15 चेंडू खेळूनही खाते उघडू शकला नाही. विदर्भाचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज भुते याच्या गोलंदाजीवर चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात असताना हॅँड्सकॉम्बला यष्टिरक्षक कुमार कुशाग्रकडे झेल द्यावा लागला. भुतेने ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा फलंदाज जोश फिलिप (5) ज्याचा झेल दुसऱ्या स्लिपमध्ये देवदत्त पडिक्कलने घेतला आणि नंतर लियाम स्कॉट (34) यांनाही बाद केले. 104 धावांत 5 गडी गमावल्यामुळे ऑस्ट्रेलिया ए अडचणीत सापडली होती. परंतु हार्परने लियाम स्कॉट (34) सोबत सहाव्या विकेटसाठी 84 धावांची आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फी (33) सोबत 89 धावांची भागिदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

आपल्या कारकिर्दीतील सहावे फर्स्टक्लास शतक पूण्घ्& करण्याच्या या नाबाद खेळीदरम्यान हार्परने पायांचा उत्तम वापर केला आणि खेळपट्टीची स्थिती व गोलंदाजीचा प्रभावीपणे सामना केला. दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर थोड्या नशिबाच्या जोरावर चौकार मारुन त्याने शतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने दुसऱ्या नवीन चेंडूवर मर्फीची एकमेव विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया ए 87 षटकांत 7 बाद 282 (जेसन 46, सॅम हार्पर नाबाद 101, नचिकेत भुते 3-35, शम्स मुलानी 3-77).

Advertisement
Tags :

.