For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हुतात्म्यांना आज अभिवादन

03:54 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हुतात्म्यांना आज अभिवादन
Advertisement

मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे म. ए. समितीचे आवाहन

Advertisement

बेळगाव : सीमाबांधवावर कर्नाटक सरकारने लादलेल्या कन्नडसक्ती विरोधात 1986 साली झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना सोमवार दि. 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कन्नडसक्ती विरोधात 1 जून 1986 रोजी मराठी भाषिकांच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. त्या आंदोलकावर कर्नाटकी पोलिसांनी बेछुट गोळीबार केला.

त्यात मोहन लक्ष्मण पाटील (सुळगा), भरमाण्णा मोनाप्पा कदम (सुळगा), कल्लाप्पा गुंडू उचगावकर (बेळगुंदी), भावकू मिनाजी चव्हाण (बेळगुंदी), मारुती देवाप्पा गावडा (बेळगुंदी), परशराम यल्लाप्पा लाळगे (उचगाव), विद्या बाळकृष्ण शिंदोळकर (हिंदवाडी), प्रकाश बाळू पाटील (विजयनगर) आणि शंकर भीमाण्णा खन्नूकर (जुने बेळगाव) हे धारातीर्थी पडले. हुतात्म्यांना दरवर्षी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन करण्यात येते.

Advertisement

अभिवादन कार्यक्रमासाठी सीमाभागातील समस्त मराठी भाषिक, म. ए. समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडी कार्यकर्त्या व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह शहर, तालुका व खानापूर म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवसेनेचेही आवाहन

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी व मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे. सीमालढ्यात शिवसेनेचे योगदान नेहमीच राहिले आहे. शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी 69 हुतात्मे दिले आहेत. त्यामुळे कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक व मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.