For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना आज अभिवादन

11:10 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना आज अभिवादन
Advertisement

हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन

Advertisement

बेळगाव : कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना शनिवार दि. 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. 1 जून 1986 रोजी झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात अनेक सीमावासियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानामुळेच 67 वर्षांनंतरही सीमाप्रश्नाची धग कायम आहे. या हुतात्म्यांना सदैव स्मरणात ठेवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिवादन केले जाते. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी 8.30 वाजता तालुका म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली अभिवादन केले जाते. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ न देता पुढील पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची माहिती मिळावी यासाठी अभिवादन कार्यक्रम केला जातो. हुतात्म्यांचा त्याग व बलिदानामुळे इतक्या वर्षांनंतरही सीमाप्रश्न धगधगता आहे. आजही कन्नडसक्ती केली जात आहे. तेव्हा हुतात्म्यांच्या बलिदानाची सीमावासियांना आठवण होते.

शहर म. ए. समितीचे आवाहन

Advertisement

1 जून 1986 रोजी झालेल्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात अनेक सीमावासियांनी हौतात्म्य पत्करले. कन्नडसक्तीला अद्यापही मराठी भाषिकांचा विरोध सुरूच आहे. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 जून रोजी सकाळी 8.30 वा. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

युवा समितीचे आवाहन

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना शनिवारी 1 जून रोजी अभिवादन केले जाणार आहे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी 8.30 वाजता सीमावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.