For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन

10:50 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेतर्फे हुतात्म्यांना अभिवादन
Advertisement

बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (सीमाभाग) बेळगाव यांच्यावतीने सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या 67 हुतात्म्यांना अशोक सम्राट चौक, रामलिंग खिंड गल्ली येथे सकाळी 9.30 वाजता अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहर प्रमुख राजू तुडयेकर, उपशहर प्रमुख प्रकाश राऊत, संघटक तानाजी पावशे, युवा सेनेचे विनायक हुलजी, प्रकाश हेब्बाजी, वैभव कामत, चव्हाण-पाटील, सुर्वेद्ध पवनशट्टी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.