‘अॅनिमल पार्क’मध्ये दिसणार सलोनी बत्रा
रणवीर कपूरचा ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट ‘अॅनिमल’ हा अत्यंत यशस्वी ठरला होता. निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची ‘अॅनिमल पार्क’ची घोषणा यापूर्वीच केली आहे. आता चित्रपटाशी निगडित एका अभिनेत्रीने ‘अॅनिमल पार्क’मधील स्वत:च्या भूमिकेची पुष्टी केली आहे.
‘अॅनिमल’ चित्रपटात रणवीर कपूरच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सलोनी बत्रा ही अलिकडेच ‘भय’ सीरिजमध्ये दिसून आली आहे. सलोनीने आता ‘अॅनिमल पार्क’चा हिस्सा असल्याची पुष्टी दिली आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट लोकांना पसंत पडला होता, याचमुळे निर्माते आता अशाप्रकारचे चित्रपट निर्माण करू पाहत आहेत. हे बॉक्स ऑफिस आणि आमच्यासाठीही चांगले असल्याचे सलोनीने म्हटले आहे. मी कधीच अभिनेत्री होऊ इच्छित नव्हते. माझी पार्श्वभूमी डिझाइन क्षेत्राची आहे. परंतु जेव्हा मी काम करते, तेव्हा नेहमीच सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करते. कारकीर्दीत पुढे जात राहण्याची माझी इच्छा आहे. बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणे अवघड असले तरीही प्रयत्न करणे माझ्या हाती असल्याचे सलोनीने म्हटले आहे.