For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलून व्यावसायिकाचा कोल्हापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल! सायकलवरून अर्ज भरून दिला पर्यावरणाचा संदेश

06:00 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
सलून व्यावसायिकाचा कोल्हापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल  सायकलवरून अर्ज भरून दिला पर्यावरणाचा संदेश
Kolhapur LokSabha Sanjay Sankapal
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ याहीवेळी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वर्षी
होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी त्यांनी सायकलवरून येऊन आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाराी कार्यालयामध्ये दाखल केला आणि मतदारांना पर्यावरणाचा संदेश दिला.

VIDEO पहा >>> सलून व्यावसायिकाने भरली कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी

Advertisement

लांबसडक मानेवर रुळणारे केस, प्रसन्न चेहरा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास घेऊन सरनोबतवाडीमधील व्यवसायाने नाभिक असलेले संदिप संकपाळ यांनी आज कोल्हापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सामाजिक कार्यात कार्यरत असलेले संदिप गेल्या दोन निवडणुकांमध्ये अर्ज करून त्यांनी मतदारांना सामाजिक संदेश दिला होता.

पंचगंगानदी प्रदूषणाच्या प्रश्नावर कोणत्याही राजकीय नेत्यानं गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप संदिप संकपाळ यांनी केला. कोल्हापूरातील पर्यावरणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नागरिकांना पर्यावरणाचा संदेश दिला. कोल्हापूरकरांनी आपल्या मताचे दान टाकून मला विजयी करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. संदीप संकपाळ यांनी 2014 आणि 19 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अनुक्रमे 10 हजार 963 आणि 6 हजार 500 मतदान मिळवलं होतं.

Advertisement
Tags :

.