For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टक्क्लग्रस्तांना औषध देणारा सलमान पसार

01:05 PM Jan 20, 2025 IST | Pooja Marathe
टक्क्लग्रस्तांना औषध देणारा सलमान पसार
Advertisement

महापालिका आरोग्य विभागाच्या कारवाईचा धसका
कोल्हापूर
टक्क्ल ग्रस्तांना औषध देण्यासाठी महावीर उद्यानात गर्दी जमवणाऱ्या सलमानवर रविवारी सकाळी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला. त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता, कारवाईचा धसका घेत कागदपत्र घेऊन येतो, असे सांगत सलमान पसार झाला.
टक्कलग्रस्तांच्या डोक्यावर जडीबुटी पासून तयार केलेलं तेल लावल्यानंतर केस येतील असं सांगून कोल्हापूर शहरातील महावीर उद्यानात सोहेल उर्फ सलमान या वैद्यूने हजारो टकलग्रस्तांची गर्दी जमवली होती. याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी सकाळी 11 वाजता महावीर उद्यानात जाऊन सलमान याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली. यावेळी या ठिकाणी औषध घेण्यासाठी आलेल्या काही टक्कलग्रस्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालत आम्ही औषध घेणारच असा पवित्रा घेतला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी करताच सलमानने आपण राजारामपुरी आणि रंकाळा येथील जेंट्स पार्लरमध्ये नोकरी केलीय. आपण न्यू पॅलेस परिसरात राहतो असे सांगून कागदपत्रे आणून देतो, अशी बतावणी केली. मात्र बराच वेळ झाला तरी घरी गेलेला सलमान परत आलाच नाही. त्याने आपला मोबाईल बंद करून धूम ठोकली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याच्या विरोधात नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्याची आणि पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.