केवळ दहा सेंकदात 'सलमान खान'ने दिला होकार
भाईजान सेटवर आमची वाघासारखी वाट बघत बसायचे
बॉलीवूड अभिनेता 'वरूण धवन'चा 'बेबी जॉन' २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. या सिनेमाचे वेगवेगळे किस्से प्रमोशन दरम्यान व्हायरल होत आहेत. सिनेमाचा लेखक निर्माता 'अॅटली' याने पिंकव्हीला ला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा शेअऱ केला.
'बेबी जॉन' या सिनेमात 'सलमान खान'चा एक कॅमिओ आहे. यासाठी निर्माता मुराद खेतानी सोबत अॅटलीची चर्चा सुरू होती. मुराद यांनी भाईजान सलमान खानला कॅमिओसाठी विचारणा केली असता, सलमान खान ने फक्त १० सेकंदात होकार दिला. सलमान खान यांच्या सीन अजून तयार झाला नव्हता. तर अॅटली यांनी भाईजान सोबत सीनसंदर्भात चर्चा करावी लागेल असे सांगितले असताना, सलमान खान म्हणला त्याची गरज नाही. मला वेळ आणि तारीख, कुठे शुटींग ते कळवा. तुम्हाला जे हवंय ते सांगा मी करेन. सलमान खान फक्त १० सेंकदात होकार दिला, असे अॅटलीने सांगितले.
पुढ अॅटली म्हणला, शुटींग लोकेशनला सलमान खान यांना १ ची वेळ होती. भाईजान १२.३० वाजताच पोहोचले आणि आमची वाघासारखी वाट बघत होते.
अॅटली सलमान खान सोबत A6 सिनेमा करणार आहे. या सिनेमाच्या कथानकाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये कमल हसन किंवा रजनीकांत यांचीही भूमिका असू शकेल. देशाला गर्व वाटेल असा सिनेमा असेल असेही अॅटली यांनी सांगितले.