सलमान आणि अॅटलीच्या चाहत्यांना धक्का?
सलमान खान-अॅटलीचा पुढचा चित्रपट रद्द?
५०० कोटींच्या बजेटच्या अफवांमध्ये अॅटलीने केले 'मूव्हिंग ऑन'
मुंबई
सध्या साऊथचा दिग्दर्शक अॅटली आणि सलमान खान यांच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपटाचे आश्वासन दिले होते. पण या संदर्भात चाहत्यांना धक्का बसणार आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे चाहते दिग्दर्शक अॅटलीच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने ही उस्तुकता आणखीच शिगेला गेली असताना एका वृत्तानुसार, अॅटलीने काही अज्ञात कारणांमुळे सलमान खानसोबतचा आगामी चित्रपट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुष्पा फेम तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत त्याच्या आगामी चित्रपटासाठी मुव्ह ऑन केले आहे. अशी माहीत समोर येत आहे.
तरी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सलमान खान आणि अॅटलीच्या A6 चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अॅटली म्हणाला, A6 हा सिनेमा खूप वेळ आणि ऊर्जा खाणारा आहे. याची पटकथेचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत. देवाच्या कृपेने लवकरच एक धमाकेदार घोषणा करू.
पुढे अॅटली असेही म्हणाला होता की, हा आपल्या देशातील सर्वात अभिमानी चित्रपट असणार आहे.
त्यामुळे सलमान खानचे चाहते आणि अॅटलीच्या दिग्दर्शनाचे चाहते या संदर्भातील अधिकृत अपडेटी वाट पाहत आहेत.