महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विक्रीमुळे दुसऱ्या सत्रात घसरणीची नोंद

06:36 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 384 तर 140 अंकांनी प्रभावीत : एचडीएफसीचे समभाग घसरणीत

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यात पहिल्या दिवशी बाजार अल्पशा तेजीसह बंद झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशीच्या सत्रात मंगळवारी मात्र ही तेजी कायम टिकवण्यात बाजाराला अपयश आल्याचे दिसून आले. यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात समभाग विक्री झाल्याचा परिणाम हा नकारात्मकपणे झाल्याने बाजारात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हे घसरुन बंद झाले आहेत.

बाजारात गुंतवणूकदारांनी विविध क्षेत्रातील समभागांची विक्री केली आहे. यामध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागात विक्रीमुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. दरम्यान मंगळवारी जागतिक बाजारात मात्र सकारात्मक कल राहिला होता.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकामध्ये इंट्राडेमध्ये 3 टक्क्यांची घसरण राहिली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 383.69 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.52 टक्क्यांसोबत 73,511.85 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 140.20 अंकांसोबत निर्देशांक 22,302.50 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समध्ये पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, टाटा मोर्ट्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. यामध्ये 1 ते 4 टक्क्यांपर्यंत घसरणीची नेंद केली आहे.

दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस, आयटीसी, कोटक बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग हे लाभात राहिले. या समभागांच्या कामगिरीमुळे बाजाराला काहीसे समर्थन राहिले होते.

जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट यांचे समभाग लाभात राहिले. तर हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिला. युरोपमधील मुख्य बाजारात सुरुवातीला तेजी राहिली. शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी 2,168.75 कोटी रुपये किंमतीच्या समभागांची विक्री केली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article