सहा महिन्यात ईव्ही वाहनांची विक्री 25 टक्क्यांनी वाढली
एकूण 8 लाख वाहनांची विक्री : ई-कार विक्री 1.3 टक्क्यांनी तेजीत
नवी दिल्ली :
इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) विक्री सप्टेंबरमध्ये वार्षिक 25 टक्क्यांनी वाढली. एकूण ईव्ही नोंदणी (सर्व विभाग एकत्रित) 1.49 लाख होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1.19 लाख ईव्हीची नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा 1.47 लाख होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) 19 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या कालावधीत एकूण 8.37 लाख ईव्हीची नोंदणी झाली.
गेल्या वर्षी याच कालावधीत 7.02 लाख वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती आहे. वाहन पोर्टलच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची (कार आणि एसयूव्ही) विक्री 43,120 युनिट्सवर होती. गेल्या वर्षी याच कालावधीत 42,550 ई-पॅसेंजर वाहनांची विक्री झाली होती. पहिल्या तिमाहीत विक्री 8.6 टक्क्यांनी वाढून 22,749 युनिट झाली. दुसऱ्या तिमाहीत विक्री 6 टक्क्यांनी घसरून 20,141 युनिट्सवर आली.
दुचाकी विक्री 40 टक्के वाढली
टू-व्हीलर ईव्ही विक्री सप्टेंबरमध्ये 40 टक्क्यांनी वाढून 88,000 युनिट्सवर पोहोचली. सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरची विक्री 88 हजार युनिट होती. सप्टेंबर 2023 मध्ये ती 63 हजार युनिट्स आणि ऑगस्ट 2024 मध्ये 87 हजार युनिट्स होती. म्हणजे वार्षिक आधारावर 40 टक्क्यांची वाढ राहिली आहे.
सप्टेंबरमध्ये इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची नोंदणी 54 हजार युनिट होती. सप्टेंबर 2023 मध्ये ती 49 हजार युनिट्स आणि ऑगस्ट 2024 मध्ये 52 हजार युनिट्स होती. म्हणजे वार्षिक आधारावर 10 टक्क्यांची वाढ आहे.
चार्जिंग केंद्रे आणि विजेचा वापर
देशातील चार्जिंग स्टेशनवरील विजेचा वापर दुपटीने वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ईव्हीच्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर (पीसीएस) विजेचा वापर वर्षानुवर्षे दुपटीने वाढला आहे. या कालावधीत 17.69 कोटी युनिट ऊर्जेचा वापर झाला, जो वार्षिक आधारावर 108 टक्केपेक्षा जास्त आहे.
मारुतीच अव्वल
सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुतीची एकूण विक्री (देशांतर्गत आणि निर्यात) सप्टेंबरमध्ये 2 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण 1,84,727 वाहनांची घाऊक विक्री झाली. 27,728 कार निर्यात झाल्या, गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तुलनेत 23 टक्के जादा आहे. ह्युंडाईच्या एकूण विक्रीत एसयूव्हीचा वाटा 70 टक्के अधिक आहे. एका महिन्यात सर्वाधिक एसयूव्ही विक्रीचा हा त्यांचा विक्रम आहे. 13.8 टक्क्यांचा हिस्सा सीएनजीकडे आहे.
2030 पर्यंत इव्हींची संख्या 5 कोटीपार?
2023-24 मध्ये भारतात 16.82 लाख ईव्ही होत्या, ज्या जुलै 2024 पर्यंत वाढून 45.75 लाख झाल्या आहेत. असा अंदाज आहे की 2030 पर्यंत देशात 5 कोटी ईव्ही असतील, ज्या 4 लाख कोटी रुपयांच्या बाजारपेठेत पोहोचू शकतील. फेब्रुवारी 2022 मध्ये 1,800 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स होती, जी मार्च 2024 मध्ये 16,347 पर्यंत वाढली.