‘आयटी’मधील विक्रीने बाजार प्रभावीत
सेन्सेक्स निर्देशांक 360 तर निफ्टी 101 अंकांनी घसरणीत
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवड्यात तीन दिवसच शेअर बाजाराचे सत्र चालले. यामध्ये सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा व शुक्रवारी प्रजासत्ताक दिन असल्याने बाजाराला सुट्टी राहणार आहे. मंगळवार ते गुरुवार बाजार सुरु राहिला होता. यामध्ये अंतिम सत्रात गुरुवारी भारतीय भांडवली बाजारात जागतिक घडामोडी व आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरुन बंद झाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसखेर बीएसई सेन्सेक्स 359.64 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 70,700.67 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 101.35 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 21,352.60 वर बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे समभाग सहा टक्क्यांनी नुकसानीत राहिले. कंपनीचा डिसेंबर तिमाहीमधील लाभ हा 60 टक्क्यांनी घटून 510.4 कोटी रुपयांवर राहिला आहे. यासह भारती एअरटेल, आयटीसी, एचसीएल टेक, एशियन पेन्ट्स, विप्रो, एचडीएफसी बँक, नेस्ले, टाटा स्टील, टाटा कंसल्टंसी आणि मारुती सुझुकीचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास एनटीपीसीचे समभाग हे नफा कमाईत राहिले आहेत. आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग हे वधारुन बंद झाले. तसेच स्मॉलपॅप निर्देशांक 0.5 टक्के इतका वधारलेला होता. तर मिडपॅप निर्देशांक 0.36 टक्के इतका घसरणीत राहिला.
जागतिक संकेत
जागतिक पातळीवर गुरुवारच्या सत्रात आशियातील अन्य बाजारांच्या कामगिरीत दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे वधारले आहेत. युरोपमधील मुख्य बाजार दुपारनंतर प्रभावीत राहिले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- बजाज ऑटो 7597
- अदानी पोर्टस 1146
- एनटीपीसी 314
- कोल इंडिया 389
- इंडसइंड बँक 1512
- आयसीआयसीआय 1009
- रिलायन्स 2706
- बजाज फिनसर्व्ह 1630
- महिंद्रा आणि महिंद्रा 1635
- बजाज फायनान्स 7085
- जेएसडब्ल्यू स्टील 815
- हिंडाल्को 567
- ग्रासिम 2076
- हिरो मोटोकॉर्प 4442
- लार्सन टुब्रो 3593
- टाटा मोटर्स 811
- टायटन 3770
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा 1322
- सिप्ला 1369
- भारती एअरटेल 1160
- एलटीआय माइंट्री 5494
- एसबीआय लाइफ 1380
- डिव्हीस लॅब्ज 3578
- आयटीसी 455
- एशियन पेंटस् 2949
- विप्रो 470
- एचसीएल टेक 1550
- अॅक्सिस बँक 1042
- युपीएल 537
- एचडीएफसी बँक 1434
- नेस्ले 2482
- कोटक महिंद्रा 1768
- मारुती सुझुकी 9881
- टाटा स्टील 133
- एसबीआय 612
- टीसीएस 3810
- डॉ. रे•िज लॅब्ज 5855
- अपोलो हॉस्पिटल 6168
- बीपीसीएल 474
- एचयुएल 2428
- आयशर मोटर्स 3616