For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राकेश गंगवाल यांच्याकडून इंडिगोतील हिस्सेदारीची विक्री

06:44 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
राकेश गंगवाल यांच्याकडून इंडिगोतील हिस्सेदारीची विक्री
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हवाई क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल हे सहकारी कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनमधील हिस्सेदारी विकली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राकेश गंगवाल यांनी एकंदर इंटरग्लोब एव्हिएशनमधील 5.8 टक्के इतकी हिस्सेदारी विकली आहे, असे समजते. याआधी गंगवाल हे केवळ 3.3 टक्के इतकी हिस्सेदारी विकणार होते. परंतु त्यांनी आपल्या निर्णयामध्ये आता बदल केला असल्याचेही सांगितले जात आहे.

गंगवाल यांनी इंटरग्लोब एव्हिएशनमधील 22.5 दशलक्ष समभाग सोमवारी विक्री केले आहेत. 3015 रुपये प्रति समभाग प्रमाणे विक्रीचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. या बातमीचा परिणाम समभागावर दिसून आला. सकाळी 3015 रुपयांवर असणारा समभागाचा भाव इंट्रा डे दरम्यान 3262 रुपयांवर पोहचला होता.

Advertisement

किती आहे हिस्सेदारी

गंगवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ट्रस्टकडे इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये जवळपास 25 टक्के इतकी हिस्सेदारी आहे मात्र 2022 च्या फेब्रुवारीपासून राजीनाम्यानंतर गंगवाल परिवाराने इंटरग्लोब एव्हिएशनमधून हिस्सेदारी कमी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला चार टक्के हिस्सेदारी विकून 2900 कोटी रुपये प्राप्त केले होते आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा 2.8 टक्के हिस्सेदारी विकण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये एक ब्लॉक डील झाली ज्यामध्ये गंगवाल यांनी 45 कोटी डॉलर्सचे समभाग विकले होते.

तिमाहीत 2998 कोटीचा नफा

डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये इंडिगोने 2998 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. एक वर्षाच्या आधीच्या कालावधीमध्ये याच तिमाहीत कंपनीने 1418 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

Advertisement
Tags :

.