For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालक असल्याचे भासवून भलत्याच्याच भूखंडाची विक्री

06:55 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालक असल्याचे भासवून भलत्याच्याच भूखंडाची विक्री
Advertisement

वडगावच्या वृद्धेला अटक : आणखी एक फरारी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

भूखंडाचे मूळ मालक आपणच असल्याचे भासवून भलत्यांच्याच मालकीच्या भूखंडाची विक्री केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी एका 80 वर्षीय वृद्धेला अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

मंदाकिनी सदाशिव पारिश्वाडकर (वय 80) मूळची राहणार शिवाजी रोड, मुजावर गल्ली, सध्या राहणार गणेश कॉलनी, वडगाव असे त्या वृद्धेचे नाव आहे. याकामी वृद्धेला मदत करणारा व फसवणूक प्रकरणाला कारणीभूत असणारा राहुल अनिल मगदूम, राहणार काकती हा फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तो आणखी दोन प्रकरणात पेलिसांना हवा आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमनी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक एच. एल. केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी 31 ऑगस्ट रोजी या वृद्धेला अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यात अशाच प्रकरणात मार्केट पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.

4 फेब्रुवारी 2025 रोजी रत्ना यशवंत मब्रूकर (वय 68) राहणार माळमारुती एक्स्टेन्शन या वृद्धेने मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या फसवणूक प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी मंदाकिनी या वृद्धेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता कणबर्गी रोडवरील 40×50 भूखंडाचे मालक आपणच असल्याचे सांगत 16 सप्टेंबर 2023 रोजी उत्तर विभाग उपनोंदणी कार्यालयात वेबकॅमेऱ्यामध्ये फोटो काढून घेऊन अंगठा दाबून भूखंडाची विक्री केल्याची कबुली या वृद्धेने दिली आहे. या कृत्यासाठी वृद्धेला भाग पाडणाऱ्या राहुल मगदूमचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.