For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोल्हापूर येथे संरक्षित ‘पाकड’ माशाची विक्री ; वन विभागाची धडक कारवाई

02:01 PM Feb 26, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर येथे संरक्षित ‘पाकड’ माशाची विक्री   वन विभागाची धडक कारवाई
Advertisement

                         फुलेवाडीतील फ्रेंडशिप फिश कंपनीवर छापा; दुर्मीळ मासा जप्त

Advertisement

कोल्हापूर -करवीर वन परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, वनक्षेत्रपाल, करवीर यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने कोल्हापूर-फुलेवाडी रिंग रोडवरील 'फ्रेंडशिप फिश कंपनी" येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान, या ठिकाणी डा संरक्षित मासा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. या प्रकरणी वनरक्षक, करवीर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये आरोपी म्हणून सुनील विनोद सातपुते (रा. येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, साहाय्यक वन संरक्षक (वनी /कॅम्पा) विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर, नंदकुमार नलवडे, वनपाल करवीर, सागर कोळी, वनरक्षक करवीर ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे, पशु वैद्यकीय अधिकारी, वनविभाग, कोल्हापूर डॉ. संतोष वाळवेकर, मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी हे पुढील तपास करीत आहेत. दुर्मिळ समुद्री जीवांची अवैध विक्री ही पर्यावरणीय समतोलासाठी घातक ठरत आहे. अशा प्रकरणांत कठोर कारवाई करूनच या गैरप्रकारांना आळा घालता येईल, असे मत वन विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Advertisement

इनस्टाग्रामवर रिल्स व्हारयल
पाकड मासा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी बुधवारी फुलेवाडी येथील फ्रेंडशिप फिश कंपनीवर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली. दरम्यान, मंगळवारपासून या कंपनीच्या इनस्टाग्रामवरील पेजवर या माशाची विक्री करण्यात येणार असल्याची रिल्स कंपनीकडून व्हायरल करण्यात आली. मात्र या माशाची विक्री व्हायच्या आत वन विभागाने तप्तरता दाखवत कारवाई केली.

पाकड ही दुर्मीळ प्रजाती
पाकड शॉर्टफिन डेव्हिल रे ही समुद्री रे माशांची दुर्मिळ प्रजाती असून ती वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या दुर्मीळ यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे या माशाची शिकार, साठवणूक, वाहतूक अथवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.

Advertisement
Tags :

.