महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नवजात बालकांची विक्री : टोळीचा पर्दाफाश

06:23 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौघांना अटक : टोळीकडून 60 बालकांची विक्री केल्याचे चौकशीतून उघड

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मंड्या येथील भ्रूणलिंग निदान आणि भ्रूणहत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात अव्याहतपणे नवजात बालकांची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बालकाला जन्म देणाऱ्या मातेचाही समावेश आहे. विक्रीसाठीच बालकांना जन्म देण्यात येत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी कारवाईविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे तीन महिलांनाही अटक करण्यात आली आहे. कन्नन रामस्वामी, मुरुगेश्वरी, शरण्या, हेमलता अशी नवजात बालकांच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच महालक्ष्मी, गोमती, राधामणी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

नवजात बालकांची विक्री करणारी टोळी जन्मानंतर काही दिवसांतच बालकांची विक्री करत होते. यापेक्षा पुढे जाऊन मुले जन्माला येण्याआधी किंवा गर्भधारणा होण्याआधीच बालकांच्या विक्रीचा व्यवहार केला जात होता. सुरुवातीला या टोळीतील काहीजण अत्यंत गरीब महिला आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधत होते. त्यातही अत्यंत कमी वयात लग्न होऊन गर्भवती झालेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवत होते. बालक जन्माला येण्याआधीच त्याच्या विक्रीचा सौदा केला जात. बालक जन्माला येताच काही दिवासांती ते खरेदी करून मूल नसणाऱ्या दाम्पत्यांना विक्री केली जात होती. या टोळीकडे 60 मुलांसाठी मागणी असल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून उघडकीस आली आहे.

प्रकरण कसे आले उघडकीस?

मुरुगेश्वरी गर्भवती असताना नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीने तिला पैशांची गरज असल्याचे हेरले. तिची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरनेच तिची टोळीशी भेट घडवून आणल्याचे समजते. टोळीतील सदस्यांनी मुरुगेश्वरीला पैसे, आरोग्याची हमी व इतर प्रकारे साहाय्य करण्याची ग्वाही दिली. 24 नोव्हेंबर रोजी 20 दिवसांच्या बालकाची विक्री होणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. आरोपी बेंगळूरच्या राजराजेश्वरीनगर येथील एका मंदिराजवळ तामिळनाडू नोंदणीच्या कारमधून आले. त्यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींनी काही इस्पितळांच्या डॉक्टरांनाही हाताशी धरून आपला अवैध प्रकार सुरू ठेवला होता.

8 ते 15 लाखापर्यंत दर?

आरोपी एका नवजात बालकासाठी 8 लाख रुपये ते 15 लाख रुपयांपर्यंत दर ठरवत होते. सुमारे 60 बालकांची विक्री केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली आहे. दरम्यान, बालकांच्या विक्रीसाठी आगाऊ व्यवहार केलेल्या 10 पालकांची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.

तीन महिन्यात 242 भ्रूणहत्या झाल्याचे स्पष्ट

भ्रूणलिंग निदान आणि भ्रूणहत्या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आरोपींनी दीड हजाराहून अधिक तसेच मागील तीन महिन्यात 242 भ्रूणहत्या केल्याची बाब बेंगळूर शहर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आली आहे. आरोपींपैकी एक टीम भ्रूणलिंग निदान, हत्येसाठी एक टीम काम करत होती. आरोपींच्या फोन कॉल्सची माहिती पडताळल्यानंतर त्यांचे अनेक डॉक्टरांशी कनेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींचे संपर्क असलेल्यांना पोलिसांनी फोन केल्यानंतर ते उचलले जात नाहीत. भ्रूणहत्येसाठी आरोपींनी नियोजनबद्ध तयारी केल्याने इतके दिवस हा प्रकार उघडकीस आला नव्हता. आतापर्यंत या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी मुळचे म्हैसूर आणि मंड्या जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली.

मंड्या येथील आलेमने, म्हैसूर आणि बेंगळूरमधील बायप्पनहळ्ळी येथील इस्पितळांमध्ये भ्रूणहत्या केली जात होती. मध्यस्थांमार्फत महिलांना हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. एका भ्रूणहत्येसाठी 20 हजार रुपये घेतले जात होते. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत अशा 242 घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. गर्भवती स्त्रियांना हेरून गर्भलिंग तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. स्त्राrभ्रूह असेल तर गर्भपात केला जात होता. अधिक चौकशीनंतर चेन्नई येथील डॉक्टर तुलसीराम, म्हैसूरमधील खासगी हॉस्पिटलचा डॉ. चंदन बल्लाळ, त्याची पत्नी मीना, म्हैसूरमधील हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट रिझ्मा, लॅब टेक्निशियन निस्सार यांना अटक करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article