Kolhapur News : महापालिकेत शहर अभियंतासह 19 कर्मचाऱ्यांचा वेळेत हजर न राहिल्यामुळे वेतन कपात
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची अचानक तपासणी
कोल्हापूर : शहर अभियंता रमेश मरकर, वित्त अधिकारी राजश्री पाटील यांच्यासह महापालिकेचे १९ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कार्यालयीन वेळत येण्यास लेट झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी संबंधितांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात केले आहे. कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणाऱ्यांना कारवाईचा दणका बसला आहे.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता महापालिकेच्या मुख्या इमारतीमधील मुख्य लेखापाल, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, रेकॉर्ड विभाग, नगरसचिव विभाग तसेच शहर अभियंता कार्यालयाची अचानक तपासणी केली. यावेळी दोन अधिकाऱ्यांसह १९ महापालिका मुख्य इमारतीमधील विविध विभागांची गुरुवारी सकाळी अचानक तपासणी करत कार्यालयात वेळेवर उपस्थित नसलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई केली. कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
तपासणी दरम्यान शहर अभियंता रमेश मस्कर व वित्त अधिकारी राजश्री पाटील हे कार्यालयात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ व नगरसचिव सुनील बिद्रे इतर विभागात उपस्थित होते. तसेच विविध विभागांतील एकूण १९ कर्मचारी तपासणीच्या वेळेस अनुपस्थित होते. उपस्थितीबाबत झालेल्या या निष्काळजीपणाची गंभीर नोंद घेत प्रशासकांनी संबंधित दोन्ही अधिकारी आणि अनुपस्थित १९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत उपस्थित होते.
तर इतर कार्यालयात काय परिस्थिती
मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी यापूर्वीडी महापालिकेत अशी अचानक तपासणी करत कार्यालयात वेळेत हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. यावेळी मुख्य इमारतीसह इतर सर्व कार्यालयात सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र गुरुवारीही दोन अधिकाऱ्यांसह १९ कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अशी अवस्था असेल तर इतर चार विभागीय कार्यालयांसह इतर कार्यालयामध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे