महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

94 सफाई कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निकालात

10:55 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन दिवसात जमा होणार सात महिन्यांचे वेतन

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेतील 154 सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. मात्र सिंधुत्वाच्या दाखल्यामुळे त्यांना वेतन देण्यात आले नव्हते. आता 94 जणांनी हा दाखला दिल्यानंतर सात महिन्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एक ते दोन दिवसात त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे मनपातून सांगण्यात आले. महानगरपालिकेने 154 कर्मचाऱ्यांना वर्षभरापूर्वीच कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्यात आले होते. मात्र विविध कारणांनी त्यांना वेतनच देण्यात आले नव्हते. दोन दिवसापूर्वी 30 सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यात आले होते. त्यानंतर आता 64 जणांचे वेतन जमा केले जाणार आहे. अजून 58 जणांचे वेतन जमा झाले नाही. मात्र त्यांचेही वेतन लवकरच दिले जाणार आहे.

Advertisement

महानगरपालिकेने 154 सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकालात काढला आहे. मात्र अजून 100 जणांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याबाबत नियुक्ती पत्र देण्यात आले नाही. 15 दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती. त्या 100 जणांनाही लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अजूनही त्या 100 जणांना नियुक्ती पत्र दिले नाही. त्यामुळे 8 दिवसानंतर पुन्हा त्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला, जनरल सेक्रेटरी विजय निरगट्टी, मुनीस्वामी भंडारी, षण्मुख आदेंद्र, राम मोहन साके, मालती सक्सेना यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article