सत्य घटनांवर आधारित ‘सलाकार’
ऑगस्ट महिन्यात दरवेळी देशभक्तीने युक्त चित्रपट आणि वेबसीरिज मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत असतात. यावेळीही काहीसे असेच घडणार आहे. आता ‘सलाकार’ हा प्रोजेक्ट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होईल. जियो हॉटस्टारने ‘सलाकार’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनी एक व्हिडिओ जारी केला असून याची सुरुवात एका व्हॉइसओव्हरने होते. यात ‘जनरल जिया पाकिस्तानसाठी पहिला अणुबॉम्ब तयार करु पाहतोय’ असे वाक्य ऐकू येते. या सीरिजमध्ये मुकेश ऋषि, नवीन कस्तुरिया आणि मौनी रॉय हे कलाकार दिसून येतील. याची कहाणी सत्य घटनांवर आधारित आहे. पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीपासून रोखण्यासाठी भारतीय यंत्रणांकडुन एका अधिकाऱ्याला तेथे पाठविले जाते. हा अधिकारी पाकिस्तानात राहून मोहीम राबवत असतो. सलाकार या सीरिजची कहाणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर आधारित असल्याची चर्चा आहे. मुकेश ऋषि यांनी जनरल जिया यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर नवीन कस्तुरिया हा ‘सलाकार’च्या मुख्य भूमिकेत आहे. ही सीरिज 8 ऑगस्टपासून जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.