Mumbai News | मुंबईत मॅनहोलचा आणखी एक बळी! साकीनाकात उघड्या मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू;
मुंबई -मुंबई आणि उपनगरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातचंसाकीनाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.या व्यक्तीचे नाव अस्लम शेख असुन या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला असून, त्यामध्ये घडलेला प्रकारांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण..
साकीनाका येथील खैरानी रोड भागात मॅनहोल दुरुस्तीचे काम सुरु होते. या कामामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. यावेळी अस्लम शेख मोबाईलवर बोलत रस्त्याने चालत येत असताना थेट उघड्या मॅनहोलमध्ये कोसळले. जवळच काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने तत्काळ खाली डोकावून पाहिले आणि त्यानंतर महानगरपालिका तसेच बचाव पथकाला माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मॅनहोल सुमारे 20 ते 25 फूट खोल असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अस्लम शेख यांना पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.संबंधित मॅनहोलची खोली सुमारे 20 ते 25 फूट असून, खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. इथं बॅरिकेटही करण्यात आलं नव्हतं. इथ काम करणाऱ्या कामगारांच्या निष्काळजीपणामुळे सदर व्यक्तीचा जीव गेल. असा आरोप नागरिकांकडुन केला जात आहे..
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना
काही दिवसापुर्वी मुंबईतील चेंबूर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी दुर्घटना घडल्याचे समोर आले होते..चेबूर येथील 11 नंबर रोडवर एका धावत्या शाळकरी मुलांच्या बसवर अचानक एक भलामोठा वृक्ष कोसळला. त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.