साईश्वरी, भूमिका, रोहिणी चीनला रवाना
बेळगाव : बेळगावच्या डीव्हायईएसच्या ज्युडो खेळाडूंसह प्रमुख प्रशिक्षिका रोहिणी पाटील या चीन येथे होणाऱ्या एशियन खुल्या ज्युडो स्पर्धेसाठी चीनला रवाना झाल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत साईश्वरी कोडुचवाडकर केरळ येथे साऊथ झोन महिला राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत रौप्य तर बळ्ळारी येथे झालेल्या स्पर्धेत कास्यपदक पटकाविले. या कामगिरीची दखल घेवून फेडरेशन चषक राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत साईश्वरीची निवड झाली होती. तेथील सराव शिबिरात साईश्वरीने केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. व भूमिका व्ही. एन. हिने बळ्ळारी येथे झालेल्या जीएसडब्ल्यु स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. त्याच प्रमाणे आशिया स्पर्धेसाठी कझाकस्तान येथे निवड झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले तर केरळ येथे रौप्य पदक तर दिल्ली येथे झालेल्या खुल्या वरिष्ठ राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकामध्ये तिने स्थान मिळविले होते. डीव्हायईएसच्या प्रमुख प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांची भारतीय ज्युडो संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. रोहिणी पाटील या ज्युडो विभागातील अ श्रेणीतील प्रशिक्षिका असल्याने त्यांची चीन येथे रवाना झालेल्या संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल युवजन क्रीडा खात्याचे क्रीडा अधिकारी श्रीनिवास बी. व इतर प्रशिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.