For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज वॉरियर्स, मॅक्स आनंदा विजयी

10:35 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
साईराज वॉरियर्स  मॅक्स आनंदा विजयी
Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात सामन्यात मॅक्स आनंदा अकादमी व साईराज वॉरियर्स पालेकर अकादमी संघाने शानदार विजय नोंदविले. जिमखाना मैदानावरती झालेल्या मंगळवारच्या सामन्यात मॅक्स आनंद अकादमी संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचा 15 षटके व 7 गडी राखून मोठा पराभव केला. साई फार्म स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 13.3 षटकात फक्त 44 धावा केल्या. साई फार्मतर्फे एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

Advertisement

मॅक्स आनंद अकॅडमातर्फे  शिवम काटवे, राजवीर कौजलगी व अद्वैत चव्हाण यांनी यांनी प्रत्येकी 3 तर आसिफ जटगारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मॅक्स आनंद अकादमी संघाने 9.3 षटकात 3 गडी बाद  45 धावा करुन विजय नेंदविला. राजवीर कौजलगीने नाबाद 22 धावा केल्या. साई फार्मतर्फे कौस्तुभ पाटील व निखिल राठोड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रमुख पाहुणे सतीश नांदुरकर सरफराज मुरगोड व रोहित पोरवाल यांच्या हस्ते चषक देऊन सामनावीर राजवीर कौजलगी व इम्पॅक्ट खेळाडू शिवम काटवे यांना सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स पालेकर अकादमी संघाने शार्प इंटरप्राईजेस संघाचा 30 धावांनी पराभव केला. शार्प प्रिंटरप्राईजेसचे या पराभवामुळे या स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरिअर पालेकर अकादमी संघाने 25 षटकात 2 बाद 189 धावा जमविल्या. अजय लमानीने आक्रमक फलंदाजी करताना 86 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारसह 106 धावांची सुरेख शतक झळकविले. शाहरुख धारवाडकरने शानदार अर्धशतक झळकावताना 44 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 52 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गडासाठी 147 धावांची भागीदारी केली.

Advertisement

शार्प इंटरप्राईजेसतर्फे हर्षित इनामदारने 1 गडी बाद केला. शार्प एंटरप्राइजेस संघाने 25 षटकात 5 बाद 169 धावा केल्या. कर्णधार जियान सलीमवालेने 11 चौकारांसह 65 धावा जमवल्या. अक्षय बलीगर 6 चौकारांसह 38, साईराज वॉरियर्स पालेकर अकादमीतर्फे शाहरुख धारवाडकरने 2, रितेश धामणकर, गौरव परीट व श्लोक चडीचाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रमुख पाहुणे प्रमोद तिरकी व सचिन कलवार, आप्पया रोड्ड, नागेंद्र, यांच्या हस्ते सामनावीर अजय लमानी इम्पॅक्ट खेळाडू शाहरुख धारवाडकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.