For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज, सिग्नेचर, ग्रो स्पोर्ट्स, भारत विजयी

10:50 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
साईराज  सिग्नेचर  ग्रो स्पोर्ट्स  भारत  विजयी
Advertisement

फॅब चषक फुटबॉल स्पर्धा

Advertisement

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत पॅब चषक निमंत्रतांच्या अंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराज वॉरियर्स, सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब, ग्रो स्पोर्ट्स एफसी, भारत एफसी संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. ओल्ड फाटा एफसीला राहुल के. आर. शेट्टी संघाने शून्य बरोबरच रोखले.सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरिनाच्या टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने के. आर. शेट्टी किंग्ज संघाचा 2-0 असा पराभव केला.

या सामन्यात चौथ्या मिनिटाला साईराजच्या पृथ्वीराज कंग्राळकरच्या पासवर नागेश सोमनगीने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला नागेशचा पासवर पृथ्वीराज कंग्राळकर दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात सिग्नेचर एससीने टेनटेन एफसी चा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात सात व्या मिनिटाला सिग्नेचरच्या अतिफ मुजावरच्या पासवर अल्तमश जमादारने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 11 व्या मिनिटाला टेन टेन एफसीच्या निखिल नेसरीकरने बचाव फळीला चकवत गोल करून 1-1 अशी बरोबरी केली.

Advertisement

27 मिनिटाला सिग्नेचरच्या अल्तमशच्या पासवर अतिफ मुजावरने दुसरा गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात ओल्ड फाटा संघाला राहुल के. आर. शेट्टी संघाने शून्य बरोबरच रोखले. चौथ्या सामन्यात ग्रो स्पोर्ट्स एफसीने डिसाईडर एफसी चा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱ्या मिनिटाला ग्रो स्फोर्ट्सच्या इरफान बिस्तीच्या पासवर प्रशांत पाटील पहिला गोल केला. आठव्या मिनिटाला प्रशांतच्या पासवर उमर कालकुंद्रीने दुसरा गोल केला. तर 10 व्या मिनिटाला राहीदच्या पासवर प्रशांत पाटीलने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली.

दुसऱ्या सत्रात प्रशांतच्या पासवर 22 व्या मिनिटाला इरफान बिस्तीने चौथा गोल केला. तर 24 व्या मिनिटाला प्रशांतच्या पासवर राहिद एमने पाचवा गोल करून 5-0 महत्वाची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात भारत एफसीने रॉ फिटनेसचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात 7 व  11 व्या मिनिटाला भारत एफसीच्या अमृतच्या पासवर अभिषेक चेरेकरने सलग दोन गोल करून पहिल्या सत्रात 2-0 आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 17 व्या मिनिटाला रॉ फिटनेसच्या हयान शेखने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 23 व 28 व्या मिनिटाला अभिषेकच्या पासवर अमृत मण्णुरकरने सलग दोन गोल करून 4-1 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली.

Advertisement
Tags :

.