For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईराज,फँको,फास्ट फाॅरवर्ड विजयी

11:12 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
साईराज फँको फास्ट फाॅरवर्ड विजयी
Advertisement

बीडीएफए फुटबॉल स्पर्धा : गौरांग उच्चुकर, आदर्श गणेशकर, झिया व विकी उत्कृष्ट खेळाडू

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना आयोजित बीडीएफए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराजने टीएफसीचा, फँको एफसीने इलेव्हन स्टारचा, फास्ट फॉरवर्डने टीएफएचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. तर सिटी स्पोर्ट्सने गोवन्सला बरोबरीत रोखले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरांग उच्चुकर, आदर्श गणेशकर, झिया मुजावर व विकी गौतम तर इम्पॅक्ट खेळाडू म्हणून साई गवळी, प्रणय कलखांबकर, नजीब इनामदार, इंद्रनील नलवडे यांना गौरविण्यात आले. टिळकवाडी येथील  सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात साईराज वॉरियर्सने टीएफसी इलेव्हनचा 9-0 असा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या मिनिटाला शाहू काटकरच्या पासवर गौरांग उच्चुकरने पहिला गोल केला.

24 व्या मिनिटाला संजय फर्नांडीसच्या पासवर शाहू काटकरने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळविली. 33 व 39 व्या मिनिटाला गौरांग उच्चुकरच्या पासवर रोशन सांबरेकरने सलग दोन गोल करुन पहिल्या सत्रात 4-0 ची आघाडी मिळवून दिली. 45 व्या मिनिटाला शाहू काटकरच्या पासवर ऋतुराज जाधवने पाचवा गोल केला. 51 व्या मिनिटाला ऋतुराज जाधवच्या पासवर संजय फर्नांडीसने सहावा गोल केला. 55 व्या मिनिटाला रोशन सांबरेकरच्या पासवर गौरांग उच्चुकरने सातवा गोल केला. 56 व्या मिनिटाला गौरांग उच्चुकरच्या पासवर अभिषेक भुतेवाडकरने आठवा गोल केला तर 58 व्या मिनिटाला अभिषेक भुतेवाडकरच्या पासवर गौरांगने 9 वा गोल करुन 9-0 ची आघाडी साईराजला मिळवून दिली.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात सिटी स्पोर्ट्स संघाने गोवन्स स्पोर्ट्सला 1-1 असे बरोबरीत रोखले. 17 व्या मिनिटाला सिटी स्पोर्ट्सच्या साहीद बेपारीने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला गोवन्सच्या प्रांजल पिंटोने बरोबरीचा गोल करुन 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण दोघांनाही अपयश आले. त्यामुळे हा सामना बरोबरीत राहिला. तिसऱ्या सामन्यात फँको संघाने इलेव्हन स्टारचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला इशान नाईकच्या पासवर सर्वेश कुलकर्णीने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 42 व्या मिनिटाला सर्वेश कुलकर्णीच्या पासवर इशान नाईकने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात इलेव्हन स्टार संघाला गोल करण्यात अपयश आले.

चौथ्या सामन्यात फास्ट फॉरवर्ड  संघाने टीएफए संघाचा 3-1 असा पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश राहिले. दुसऱ्या सत्रात टीएफएच्या विराजने डी बाहेरुन वेगवान फटका मारत गोल करीत 1-0 ची आघाडी टीएफएला मिळवून दिली. 47 व्या मिनिटाला फास्ट फॉरवर्डच्या निखिल्च्या पासवर विकी गौतमने गोल करुन 1-1 अशी बरोबरी केली. 58 व्या मिनिटाला विकीच्या पासवर नदीमने गोल करुन 2-1 ची आघाडी मिळवून दिली. 60 व्या मिनिटाला नदीमच्या पासवर मिथीलचा तिसरा गोल करुन 3-1 ची आघाडी मिळवून दिली. सामन्यात टीएफएला गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या. त्या दवडल्यामुळे पराभवास सामोरे जावे लागले.

आजचे सामने

  • युनायटेड युथ व वायएमसीए, दुपारी 2.30 वाजता
  • कॉसमॅक्स व साईराज, दुपारी 4 वाजता
Advertisement
Tags :

.