साईराज चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून
चार गटात विभागले 42 संघ, प्रदर्शनीय सामन्यांपासूनच रंगत
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल स्पर्धेला बुधवार पासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेत 42 संघांनी भाग घेतला आहे. अ गटात-मोहन मोरे स्पोर्ट्स, स्टार इलेव्हन, नानावाडी सुपर किंग, बालाजी स्पोर्ट्स हलगा ब, वाल्मिकी कॅम्प, साला स्पोर्ट्स, राजमुद्रा स्पोर्ट्स मंडोळी, श्री इलेव्हन जेएसपी बॉईज, आदी शक्ती इलेव्हन, नील बॉईज-हिंडलगा, ब गटात-मराठा स्पोर्ट्स, दक्ष स्पोर्ट्स निलजी, जगदंबा स्पोर्ट्स हंगरगे, बालाजी स्पोर्ट्स हलगा अ, मुरगन इलेव्हन खानापूर, गो गो स्पोर्ट्स, विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ, कांतारा बॉईज, युवराज स्पोर्टस, के. आर. शेट्टी किंग्ज, क गटात- प्रथमेश मोरे, व्हीसीसी सिनीयर-60,
वक्रतुंड स्पोर्ट्स, ग्रामीण मराठा स्पोर्ट्स, साईराज वॉरियर्स, आदर्श, ब्रदर्स इलेव्हन, ब्रम्हलिंग स्पोर्ट्स बेनकनहळ्ळी, पांडुरंग सीसी नागरमुनवळ्ळी, ड गटात- के. आर. शेट्टी मंगाई स्पोर्ट्स, झारा इलेव्हन, माऊली स्पोर्ट्स देसूर, साईराज ब, एस. जी. बॉईज, डेपो मास्टर, एच.एम.डी. स्पोर्ट्स, शक्ती बॅटरीज, एवायसी इलेव्हन, एसआरएस हिंदुस्थान अनगोळ या संघांचा समावेश आहे. बुधवारी प्रदर्शनीय सामने खेळविले जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नारायण फगरे, महेश फगरे, महेश पवार, अमर सरदेसाई, शितल वेसणे, गजानन फगरे, राजेश जाधव, प्रशांत वांडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.