साईराज चषक क्रिकेट स्पर्धा 19 पासून
मालिकाविरासाठी दुचाकी वाहनाचे बक्षिस
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार दि. 19 नोव्हेंबरपासून व्हॅक्सिन डेपो मैदानावरती सुरु होत आहे. या स्पर्धेतील मालिकावीर विजेत्याला अमर सरदेसाई यांच्याकडून दुचाकी वाहनाचे बक्षिस पुरस्कृत करण्यात आले आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित या स्पर्धेत यावर्षी विजेत्या संघाला 2 लाख रुपये व आकर्षक चषक व उपविजेत्या संघाला 1 लाख 21 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. तर स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मालिकावीर पुरस्कारासाठी अमर सरदेसाई यांनी दुचाकी वाहनाचे बक्षिस पुरस्कृत केले आहे.
एका कार्यक्रमात स्पर्धा पुरस्कर्ते महेश फगरे, आनंद चव्हाण, अमर सरदेसाई यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अमर सरदेसाई यांच्याकडून दरवर्षी बक्षिस पुरस्कृत केले जाते. पण यावेळी त्यांनी मालिकावीराचे बक्षिस देण्याचे ठरविले आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूरल, सांगली, इचलकरंजी, गुजरात, हैदराबाद, जम्मू काश्मीर, गोवा, बेंगळूर, म्हैसूरसह विविध जिल्ह्यातील संघ सहभागी होत आहेत. रोख रकमेसह वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट संघ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, इम्पॅक्ट खेळाडूसह मालिकावीर पुरस्कार शिवाय प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी सुनील मोहिते, संगम साणिकोप्प, विठ्ठल कारेकर, विजय रेडेकर व आदिनाथ उपस्थित होते.