महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साईराज बहुतुले भारताचे स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक

06:03 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

भारताचा व मुंबईचा माजी लेगस्पिनर अष्टपैलू साईराज बहुतुले यांची भारतीय संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली असून भारतीय संघासोबत ते लंकेला सहा सामन्यांच्या मालिकेसाठी जाणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे.

Advertisement

गेल्या तीन वर्षापासून साईराज बहुतुले बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भारत अ आणि प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड आणि एनसीए चेअरमन व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ज्या भारतीय संघांना विविध मालिकांत मार्गदर्शन केले, त्या संघांचे बहुतुले हे साहायक स्टाफमधील सदस्य होते. 1997-2003 या कालाधवीत बहुतुले यांनी दोन कसोटी व 8 वनडेत भारताचे प्रतिनिधित्व करताना 5 बळी मिळविले होते. त्यांनी एकूण 188 प्रथमश्रेणी सामन्यांत 26.00 धावांच्या सरासरीने 630 बळी मिळविले आणि 31.83 धावांच्या सरासरीने 6176 धावा जमविल्या.

भारताच्या युवा स्पिनर्ससमवेत त्यांनी चांगले काम केले असून त्यांच्या उपस्थितीचा अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव या स्पिनर्सना चांगला फायदा होईल. कुलदीप वनडे संघाचा तर उर्वरित तिघे टी-20 संघाचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी लंकेविरुद्ध मायदेशात मालिका झाली होती, त्यावेळीही बहुतुले संघासोबत होते. 2017 मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही त्यांनी युवा स्पिनर्ससोबत काम करून त्यांना मार्गदर्शन केले होते. 51 वर्षीय बहुतुले आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे स्पिन गोलंदाज प्रशिक्षक

म्हणून काम पाहत असून स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी विदर्भ, बंगाल, गुजरात या संघांनाही प्रशिक्षण दिले आहे.

बीसीसीआयने ही तात्पुरती सोय केली असल्याचे दिसून येते. कारण लंका दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कल यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. पण ते सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेपासून भारतीय संघासाठी उपलब्ध होणार आहेत. भारतीय संघ सोमवारी कोलंबोत दाखल झाल्यानंतर तेथून कँडी हा संघ प्रयाण करेल. याच ठिकाणी टी-20 मालिकेची सुरुवात 27 जुलै रोजी होईल. नवे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमवेत साहायक स्टाफमध्ये आता अभिषेक नायर, रेयान टेन डुशे (साहायक प्रशिक्षक), साईराज बहुतुले व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांचा समावेश असेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article