सैन्यम अणि गौरव एअर पिस्तूल फायनलमध्ये अव्वल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चंदीगडच्या सैन्यम अणि उत्तर प्रदेशच्या गौरव कुमार यांनी अनुक्रमे महिला अणि पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल ट्रायल 2 फायनलमध्ये अव्वल स्थान पटकावले, रविवार येथे राष्ट्रीय निवड चाचणी 1 अणि 2 फेरी पार पडल्या.
विश्वचषक फायनलची रौप्यपदक विजेती सैन्यमने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत फायनलमध्ये 243.1 च्या प्रभावी गुणांसह अव्वल स्थान पटकावले, जे रिदम संगवान 237.7 पेक्षा 5.4 गुण अधिक होते. मीनू पाठकने पुन्हा एकदा फायनलमध्ये पहिल्या तीनमध्ये पहिल्या स्थान मिळवले अणि 218.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.यापूर्वी पात्रता फेरीत सुरुची सिंगने 587-31 च्या प्रभावी गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते, परंतु फायनलमध्ये ती केवळ आठव्या स्थानावर राहू शकली.पलकने 579-16 गुण मिळवून पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले आणि फायनलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचली.मीनू पाठकने पात्रता फेरीत 577-12 गुण मिळवले,तर प्रिया मुरलीधरने 576-16 गुण मिळवले.रिदम संगवान अणि सैन्यमने अनुक्रमे 576-15 आणि 576-13 गुण मिळवले,तर दिव्या टी.एस.ने 575-19 गुणांसह पहिल्या आठमध्ये स्थान मिळवले.गौरवने ट्रायल 1 मधील दुसऱ्या स्थानावर सुधारणा करत, अटीतटीच्या फायनलमध्ये टी -2 मध्ये अव्वल स्थान पटकावले.584-21 गुणांसह फायनलसाठी तिसऱ्या स्थनावर ठरलेल्या गौरवने फायनलमध्ये 245.5 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले.योगेश कुमार 244.6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर रहिला.उत्तर प्रदेशच्या हर्ष स्वामीने 585-26 गुणांसह अंतिम फेरीसाठी दुसऱ्या स्थानावर पात्र ठरल्यानंतर, 221.9 च्या अंतिम गुणांसह तिसरे स्थान पटकावले.