सायनेकर कुटुंबीयांकडून आईला अशीही श्रद्धांजली
11:03 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत असतात. याची प्रचिती नुकतीच आली. नाझर कॅम्प वडगाव येथील अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर यांनी आपल्या आईच्या 12 व्या दिवसाच्या निमित्ताने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपल्या आईला आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नाझर कॅम्प वडगाव येथील रहिवासी रुक्मिणी सायनेकर यांचे 16 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या 12 व्या दिनी मुलगा अभियंते ज्ञानेश्वर सायनेकर व कुटुंबीयांनी कॅम्प येथील सेंट जोसेफ वृद्धाश्रम, किल्ला तलाव परिसरातील पाथरवट समाज तसेच पिरनवाडी भागातील निराधार कुटुंबीयांना साड्या, चादरी व ब्लँकेट आदी साहित्याचे वाटप करून मदतीचा हात दिला. यामुळे निराधारांना आधार मिळाला असून त्यांच्याकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Advertisement
Advertisement