For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इच्छाशक्तीच्या जोरावर जगभराचे समुद्रभ्रमण

12:15 PM Mar 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
इच्छाशक्तीच्या जोरावर जगभराचे समुद्रभ्रमण
Advertisement

माजी नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांची माहिती : डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचा समारोप

Advertisement

पणजी : इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास आणि समुद्रभमणाची हौस याच्या जोरावर आपण जगभराची जलसफर केली ती सुद्धा 56 फूट बोटीने एकट्याने असे सांगून नौदल अधिकारी राहिलेले अभिलाष टॉमी यांनी डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात थरारक अनुभन कथन केले आणि महोत्सवाचा समारोप झाला. सोमवार 24 फेब्रुवारीपासून चालू असलेल्या डी. डी. कोसंबी विचारमहोत्सवातील  शेवटचे पुष्प टॉमी यांनी गुंफले. त्यांनी आपल्या समुद्र भ्रमणातील अनेक किस्से सांगितले आणि श्रोत्यांनी देखील त्यांना टाळ्dया वाजवून भरभरुन दाद दिली.

गोव्याच्या बोटीतून जगभ्रमण

Advertisement

त्यांनी सांगितले की, नोव्हेंबर 2012 ते मार्च 2013 या एकंदरित पाच महिन्यांच्या आणि 151 दिवसांच्या कालावधीत भारत देशासह विविध परदेशात समुद्रभ्रमण केले. विशेष म्हणजे ज्या बोटीतून जगभ्रमण केले ती बोट गोव्यातच दिवाडी येथे तयार करण्यात आली होती. आता आपण गोव्यातच पर्वरी येथे वास्तव्यास आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वोच्च आनंदाचा क्षण

जगभराची सफर पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे भारताच्या राष्ट्रपतींनी आपले शाही स्वागत केले. तो आपल्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता असे त्यांनी नमूद केले. जगाची जलसफर करण्यात यशस्वी ठरलेल्या टॉमी यांनी गोल्डन ग्लोब स्पर्धा 2018 मध्ये भाग घेतला. त्या स्पर्धेतही त्यांनी चमक दाखवली. समुद्रातील वादळ, वाऱ्याशी तोंड देताना एक अपघातात त्यांचा पाय दुखावला. तो शस्त्रक्रियेने स्थिर स्थावर केल्यानंतर ते पुन्हा स्पर्धेत उतरले व त्यांनी दुसरा क्रमांक घेऊन पहिल्या तीन चॅम्पियनमध्ये नाव कमावले, असे ते अभिमानाने म्हणाले.

सदर जागतिक स्पर्धा पूर्ण करणारे व नाव कमावणारे ते एकमेव भारतीय आहेत. त्यांनी या दोन्ही प्रकारच्या समुद्रभ्रमणात भारताचा तिरंगा ध्वज सातत्याने फडकत ठेवला आणि त्याची शान देशासह जगभरात उंचावत नेली अशी माहिती त्यांनी व्याख्यानातून दिली. समुद्रभ्रमणात ते कुशल आहेत तसेच त्यांनी भारतीय नौदलात काही वर्षे पायलट म्हणून काम केले आणि 2021 मध्ये निवृत्ती घेतल्याचे ते म्हणाले.

टॉमी यांना 2013 मध्ये जगभराची जलसफर केली म्हणून कीर्तीचक्र हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तर 2019 मध्ये नौसेना पदक त्यांना देण्यात आले. विवेक मिनेझिस यांनी टॉमी यांची थोडक्यात ओळख करुन दिली. कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी टॉमी व मिनेझिस यांना फळपरडी प्रदान केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनाही खात्यातर्फे फळपरडी प्रदान करण्यात आली.

Advertisement
Tags :

.