For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साईल तळकटकर यांना दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार जाहीर

01:02 PM Apr 22, 2026 IST | अनुजा कुडतरकर
साईल तळकटकर यांना दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार जाहीर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

वेंगुर्ला-आवेरे येथील श्री सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळातील युवा दशावतारी कलाकार ,दशावतार क्षेत्रामध्ये अल्पावधीतच ज्यांनी उंच भरारी घेतली, असे मळगाव गावचे सुपुत्र कु. साईल आपा तळकटकर यांना 'दशावतार कर्तृत्व भूषण पुरस्कार' जाहीर झाला आहे.साईल तळकटकर यांच्या सामाजिक आणि कला क्षेत्रातील निस्वार्थ सेवेची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार शनिवार १६ मे रोजी कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक नाट्य सभागृह (शिवाजी हाउसिंग सोसायटी) येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याचे आयोजन कराड येथील राजधानी सेवा प्रतिष्ठान, अनुश्री फाउंडेशन, संत शिरोमणी तुकाराम महाराज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. साईल तळकटकर यांच्या या यशाबद्दल मळगाव परिसरातून तसेच दशावतार क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.