सैफचा पुत्र करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
करण जौहर देणार संधी
करण जौहरने बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सना लाँच केले ओ. यात आलिया भट्ट आणि वरुण धवनपासून जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांची नावे सामील आहेत. आता करणने सैफ अली खान आणि अमृता सिंहचा पुत्र इब्राहिम अली खानला बॉलिवूडमध्ये आणण्याची तयारी केली आहे. करणने इब्राहिमच्या बॉलिवूड पदार्पणाची घोषणा करत एक पोस्ट केली आहे. यात त्याने सैफ अन् अमृतासोबतच्या स्वत:च्या खास नात्याचा उल्लेख केला आहे. खान परिवाराच्या गुणसूत्राताच अभिनय असल्याचा दावा त्याने केला आहे.
करणने इन्स्टाग्रामवर इब्राहिमची 5 छायाचित्रे शेअर केली आहेत. परंतु त्याने चित्रपटाचे नाव उघड केलेले नाही. इब्राहिमचा पदार्पणातील चित्रपट ‘सरजमीं’ असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात काजोल देखील मुख्य भूमिकेत असल्याचे समजते. तर याचे दिग्दर्शन कायोज इराणी करणार आहे.
बॉलिवूडमध्ये गुणवत्तेच्या नव्या लाटेसाठी मी मार्ग तयार करत आहे. इब्राहिमच्या पदार्पणावरून मी अत्यंत उत्सुक आहे. इब्राहिम अली खान लोकांच्या मनात स्वत:चे विशेष स्थान निर्माण करण्यासाठी लवकरच स्क्रीनवर येत असल्याचे करणने स्वत:च्या पोस्टमध्ये म्हटले आहे.