For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कर्तव्य’ चित्रपटात सैफ अली खान

06:51 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘कर्तव्य’ चित्रपटात सैफ अली खान
Advertisement

चालू महिन्यात ओटीटीवर होणार प्रदर्शित

Advertisement

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा ओटीटीवर गणवेशात दिसून येणार आहे. सेक्रेड गेम्समध्ये सरताज सिंहची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकलेला सैफ आता ‘कर्तव्य’ या क्राइम ड्रामापटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येईल. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान आणि गौरी यांचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे.

कर्तव्य हा चित्रपट 15 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. कर्तव्य या चित्रपटात देशाच्या  दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कहाणी मांडली जाणार आहे. सैफ यात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून तो एका मोठ्या नैतिक द्वंदात अडकला आहे. कामाच्या मोर्चावर वाढत्या धोक्यामुळे त्याचा परिवारही संकटात सापडला आहे. खासगी आयुष्य पणाला लागले असतानाही हा अधिकारी स्वत:चे कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठल्याही थराची जाण्याची तयारी करतो. या चित्रपटात सैफसोबत रसिका दुग्गल, संजय मिश्रा, जाकिर हुसैन, मनीष चौधरी यांच्यासोबत सौरभ द्विवेदीही दिसून येणार आहे. सैफचा चालू वर्षात ‘हैवान’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहेत. हा चित्रपट 2016 प्रदर्शित मल्याळी थ्रिलर ‘ओप्पम’चा रिमेक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.