राघवसोबत झळकणार सई मांजरेकर
राघव जुयालने आर्यन खानच्या बॅड्स ऑफ बॉलिवूडमध्ये ‘परवेज’ ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्याचा अभिनय आवडला होता आणि यासाठी त्याचे कौतुकही झाले होते. राघव आता एका नव्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई मांजरेकर ही अभिनेत्री काम करणार आहे. राघवने सईच्या एका छायाचित्रावर केलेल्या कॉमेंटमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. सईने एक ब्यूटीरील पोस्ट केली होती, त्यावर राघवने ‘हे सर्वकाही सेटवर आण’ अशी कॉमेंट केली आहे. या कॉमेंटमुळे राघव आणि सई दोघेही एकत्र झळकणार असल्याचा अनुमान चाहते काढत आहेत. राघव आणि सई एका रोमँटिक चित्रपटात एकत्र दिसून येणार आहे. या चित्रपटाची कहाणी रोमान्स आणि सस्पेन्सने युक्त असणार असून यात दोघांची केमिस्ट्री पाहण्याजोगी ठरणार आहे. द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधील माझ्या कामाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मी भारावून गेलो आहे. आता आणखी वेगळ्या भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे राघवने म्हटले आहे.