इंग्रजी प्रेमकथेत झळकणार सई ताम्हणकर
मराठी अभिनेता असणार मुख्य भूमिकेत
सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर या कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहता येणार आहे. याआधी त्यांनी ‘कलरफूल’ आणि ‘मीडियम स्पायसी’ या मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले हेते. त्यांनी ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘पेट पुराण’ या वेबसीरिजमध्येही एकत्र काम केले आहे. आत ही मराठमोळी जोडी एका भारतीय इंग्रजी चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या नावातच प्रेमकथा हा शब्द आहे.
सई आणि ललित यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मैसूर प्रेमकथा’ असणार आहे. हा एक भारतीय इंग्रजी फीचर सिनेमा आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी याची पटकथा लिहिली असून कुंडलकर याचे दिग्दर्शन करणार आहे. मैसूर प्रेमकथा हा चित्रपट रोमँटिक धाटणीचा असणार आहे. कुर्ग आणि मैस्रूर या सुंदर ठिकाणी या चित्रपटाचे चित्रिकरण होणार आहे.
सई चालू वर्षात श्रीदेवी प्रसन्न आणि भक्षक या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. लवकरच ती ग्राउंड झीरो, अग्नी, डब्बा कार्टेल, मटका किंग या हिंदी प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. या यादीत आता मैसूर प्रेमकथा या इंग्रजी चित्रपटाचे नाव जोडले गेले आहे. ललित सध्या ‘घंटा घंटा घंटा घंटा घंटा’ या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर सक्रीय आहे.