डब्बा कार्टेलमध्ये सई ताम्हणकर
ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्राइमने युक्त आणखी एका सीरिजची एंट्री होणार आहे. यावेळी दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी क्राइमच्या जगतावर राज्य करताना दिसून येतील. डब्बा कार्टेल नाव असलेल्या सीरिजमध्ये अनेक अभिनेत्री मुख्य भूमिकेत असून यात सई ताम्हणकरचाही समावेश आहे.
डब्बा कार्टेल या सीरिजचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचे दिग्दर्शन हितेश भाटिया यांनी केले आहे. या सीरिजमध्ये शबाना आझमी यांनी ड्रग डिलिव्हरी करणाऱ्या महिलांच्या टोळीच्या म्होरक्याची भूमिका साकारली आहे. काही महिला उपजीविकेसाठी जेवणाचा डबा विकत असतात. परंतु त्यांची भेट एका ड्रग माफियासोबत झाल्यावर त्यांचे नशीब पालटत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे.
ड्रगची डिलिव्हरी करण्यासाठी माफिया महिलांच्या जेवणाच्या डब्याचा वापर करतो आणि याकरता त्यांनी मोठी रक्कमही देत असतो. शबाना आझमी आणि शालिनी पांडे यांनी या महिलांची भूमिका साकारली आहे. याचबरोबर अंजलि आनंद, ज्योतिका, श्री प्रकाश मिश्रा, सलीम हुसैन मुल्ला, निमिशा सजायन, जिशू सेनगुप्ता, सई ताम्हणकर आणि गजराज राव हे कलाकार यात दिसून येतील ही सीरिज 28 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.