For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बोल बोल राणी’मध्ये सई ताम्हणकर

06:14 AM Jul 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘बोल बोल राणी’मध्ये सई ताम्हणकर
Advertisement

सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे यांच्या भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सई या चित्रपटात अत्यंत वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये तिची भूमिका न सुटणारं कोडं असल्याचे पहायला मिळते.

Advertisement

अपहरण, खून, संशय आणि एकामागून एक उलगडत जाणारी रहस्यं दर्शविणारा हा ट्रेलर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणारा आहे. प्रत्येक फ्रेममध्ये वाढणारा थरार, वेगवान घडामोडी आणि प्रत्येक क्षणात सईची बदलणारी छटा, अधिक गडद होत जाणारं रहस्य यामुळे हा ट्रेलर प्रेक्षकांनाही विचार करायला भाग पाडतोय.

चित्रपटाची कथा सई साकारत असलेल्या पात्राभोवती फिरत असल्याची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागचं सत्य नेमकं काय आहे? ती या रहस्याची बळी आहे की सूत्रधार? तिच्या प्रत्येक भाव अन् संवादामागे अनेक प्रश्न दडलेले असल्याने तिचं पात्र चित्रपटातील सर्वात मोठं कोडं ठरणार असल्याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट 17 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.