कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्लेतील खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत साई स्पोर्टस संघ विजयी

11:44 AM Oct 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तर युथ क्लब नवाबाग ठरला उपविजेता ; युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले येथील कॅम्प मैदानावर दोन दिवस पार पडलेल्या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत साई स्पोर्टस वेंगुर्ला याने प्रतिस्पर्धी संघ युथ क्लब नवाबाग या संघाचा २५-२२, २५-१७ अशा सेटने पराभव करीत विजयाला गवसणी घातली. तर युथ क्लब नवाबाग या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि जय मानसीश्वर मित्र मंडळ,वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला कॅम्प मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह , गोवा, केरळ, कर्नाटक, बेंगलोर आदी भागातील खेळाडूंचे २० संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेचे उदघाटन भाजपाचे युवा नेते विशाल परब यांचे हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांत भाजपा जिल्हा उपाध्यश्न प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा सदस्य सुहास गवंडळकर, प्रा. आनंद बांदेकर, तुळस माजी सरपंच विजय रेडकर, भाजपा महिला तालुका अध्यश्ना सुजाता पडवळ, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, तालुका उपाध्यश्न पि - तम सावंत, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, समीर कुडाळकर, मनोहर तांडेल, आकांशा परब, सचिन शेट्ये, नामदेव सरमळकर, प्रार्थना हळदणकर, दीपेश केरकर, सुशील परब, आबा कांबळी, रुपेश नवार, निकीत राऊळ, माजी सरपंच सोमकांत सावंत, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक येस. एल. बिडिंकर, भूषण सारंग, नामदेव सरमळकर, प्रमोद गोळम् राष्ट्रीय पंच अनिल जगदाळे आणि मोहन मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.सलग दोन दिवस चाललेल्या या खुल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत वेंगुर्लेती साई स्पोर्टस संघाने बिजेते पदासह रोख रूपये ३० हजार चे बक्षिस व आकर्षक चषकाचा मानकरी ठरला तर युथ क्लब नवाबाग संघाने विजेतेपदासह रोख रू २० हजार चे पारीतोषिकांस आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत तुतीय क्रमांक जय मानसीश्वर संघ 'अ' तर चतुर्थ क्रमांक जय मानसीश्वर संघ 'ब' यांनी पटकाविले असून या दोन्ही संघांना प्रत्येकी ७ हजार रूपयांचे पारीतोषिक व चषक देण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट अँटॅकर म्हणून जेसू, बेस्ट सेटर म्हणून जीवन पवार, बेस्ट लिबेरो म्हणून सौरभ मांजरे, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून संकेत पाटील यांना घोषिक करून त्यांना वैयक्तीक पारीतीषके व चषक प्रदान करण्यात आले.या स्पर्धेसाठी पंच म्हणून राधाककृष्ण पेडणेकर, प्रा. हेमंत गावडे, चारू वेंगुर्लेकर, ओंकार पाटकर, अजित जगदाळे, ओंकार पोयरेकर, राज चोडणकर, समालोचनाचे काम जयेश परब व सचिन सावंत यांनी पाहिले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल असोसिएशन झोनल सेक्रेटरी निलेश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरात युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रीतम सावंत, सचिन शेट्ये, रियाज मुल्ला, बबलू कुबल, राष्ट्रीय पंच अजित जगदाळे, ओंकार पोयरेकर, राज चोडणकर, केरकर, संघ मालक साईप्रसाद भोई, पांडुरंग खडपकर सॅमसन फर्नाडिस, संदीप शेटये यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे जय मानसीश्वर संघाच्या वतीने हेमंत गावडे, सॅमसन फर्नाडिस, गौरव खानोलकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर विशाल परब यांचा शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.सलग दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेस रसिका खेळाडू व युवकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी जय मानसिश्वर संघाने परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article