‘एक दिन’ चित्रपटात सई पल्लवी
ओटीटी चित्रपट ‘महाराज’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आमिर खानचा पुत्र जुनैद खान लवकरच एका चित्रपटात दिसून येणार आहे. यात तो दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री सई पल्लवीसाब्sात रोमान्स करताना दिसून येईल. सई ही दक्षिणेतील सर्वात गुणवान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच ती लवकरच एका बिगबजेट हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जुनैद खानची कारकीर्द आतापर्यंत यशस्वी ठरलेली नाही. याचमुळे स्वत:च्या पुत्राची कारकीर्द सावरण्यासाठी आमिर खान सरसावला असून तो निर्माते मंसूर खानसोबत मिळून एक नवा चित्रपट निर्माण करणार असून याचे नाव ‘एक दिन’ असणार आहे. सई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जुनैदसाठी मोठी संधी ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे करणार आहे. मंसूर आणि आमिर यांच्या जोडीने यापूर्वी ‘जाने तू या जाने ना’ हा हिट चित्रपट निर्माण केला होता. एक दिन हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. स्वत:ला बॉलिवूडमध्ये सिद्ध करण्यासाठी जुनैदकरता ‘एक दिन’ हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.