For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत होणार साई पालखीचे आगमन

गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत होणार साई पालखीचे आगमन
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75
Advertisement

सावंतवाडी / प्रतिनिधी :आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात मंगळवार, दि. २८ जुलै व बुधवार, दि. २९ जुलै या दोन दिवसांत गुरुपौर्णिमेनिमित्त साई पालखीचे आगमन होणार असून, त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

Advertisement

उद्या, मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजता माडखोल येथील साई वात्सल्यधाम येथून साईंची पालखी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहे. यावेळी आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येणार आहे.

त्यानंतर बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता पालखी माडखोल येथील साई वात्सल्यधामकडे रवाना होणार असून, या पालखीचे नेतृत्व आमदार दीपक केसरकर करणार आहेत. याच दिवशी माडखोल येथील साई वात्सल्यधाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास भाविक, शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.