महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘ग्राउंड झिरो’मध्ये सई

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आता इमरान हाश्मीसोबत धमाल करताना दिसून येणार आहे. इमरानच्या चित्रपटात सईची एंट्री झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘ग्राउंड झिरो’ आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटच्या या चित्रपटात प्रतीक गांधी देखील झळकणार आहे. सईने यापूर्वी भूमी पेडणेकरचा ओटीटीवर प्रदर्शित चित्रपट ‘भक्षक’मध्ये भूमिका साकारली होती. या भूमिकेचे कौतुक झाले होते. सई आता ग्राउंड झिरो चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत प्रत्येक जण जोडला जाऊ इच्छितो. मला या कंपनीसोबत काम करण्याची संधी तीनवेळा मिळाली आहे. हा माझ्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. इमरान आणि प्रतीक हे दोघेही गुणवंत कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणेच विशेषाधिकार आहे. या चित्रपटावरून मी उत्सुक असून प्रेक्षकांना काहीतरी रंजक पहायला मिळणार आहे. माझ्याप्रमाणे मेहनती असलेले आणि  स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी नव्या संधीचे दरवाजे उघडू शकेन अशी अपेक्षा असल्याचे सईने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article