For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साई फार्म स्पोर्ट्स क्लब, के आर शेट्टी किंग्स उपांत्य फेरीत

10:45 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
साई फार्म स्पोर्ट्स क्लब  के आर शेट्टी किंग्स उपांत्य फेरीत
Advertisement

विश्रुत चिट्स चषक, क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत  चिट्स चषक 13 वर्षाखालील मुलांच्या लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत के.आर. शेट्टी किंग्च व साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने शानदार विजयांसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आदित्य हुंबरवाडी, अर्जुन येळ्ळूरकर याना सामनाविर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना पहिला सामन्यात के. आर. शेट्टी किंग्ज संघाने दुबळ्या  एमसीसीसी रॉयल्स संघाचा तब्बल 130 धावानी पराभव केला. के आर शेट्टी किंग्ज प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडीबाद 219 धावा केल्या. त्यात आदित्य हुंबरवाडीने 8 चौकारांसह 52, स्वयंम खोतने 8 चौकारांसह 45, सुहास हिरेकुडीने 3 चौकारांसह 26, अतिथी भोगणने 2 चौकायांसह 20, वरदराज पाटीलने 2 चौकारांसह 19 धावा केल्या. रॉयल तर्फे निखिल आडकेने 3 तर फराज व नुमान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल्स संघ 25 षटकात पाच बाद 89 धावा जमवू शकला. त्यात समी हजरतभाईने 5 चौकारांसह 28, निखिल आडकेने 4 चौकारांसह 19, तर अमोघ हिरेमठने 2 चौकार  व एक षटकारांसह 17 धावा केल्या. के आर शेट्टी संघातर्फे अतिथी भोगणने 10 धावात 4, सुहास हिरेकोडीने एक गडी बाद केला.

दुसऱ्या सामन्यात साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने टिळकवाडी कोचिंग अकादमी संघाचा 65 धावांनी पराभव केला. साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 156 धावा केल्या. त्यात सलामीवीर अर्जुन  येळ्ळूरकरने 9 चौकार व  एक षटकारांसह 59 धावा, साईराज पोरवालने 3 चौकारांसह 26, अद्वैत चव्हाणने 4 चौकारांसह 18 धावा केल्या. टिळकवाडी संघातर्फे सुजल गोरलने 3, विराज पाटीलने 2 तर कौस्तुभ पाटीलने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी क्रिकेट कोचिंग अकादमी संघाने 25 षटकात 9 गडीबाद 91 धावा केल्या. त्यात सुजल गोरलने 27, स्वराज जुवेकरने 22 व विराज पाटीलने 20 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब तर्फे सुरज सक्री, अथर्व करडी व सार्थक मुऊडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे बसवराज हिरेमठ सारंग राघोचे व प्रशांत तेंडुलकर यांच्या हस्ते सामनावीर आदित्य हुंबरवाडी इम्पॅक्ट खेळाडू अतिथी भोगण यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात प्रमुख पाहुणे सचिन पाचापुरे विनायक पवार व रोहित पोरवाल यांच्या हस्ते सामनावीर अर्जुन  येळ्ळूरकर व इम्पॅक्ट खेळाडू सुजल गोरल यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.